नमस्कार, माझं नाव संतोष कचरू ससाणे राहणार फुलेनगर, औरंगाबाद. Santosh Sasane
मी गेल्या बारा-तेरा वर्षांपासून केटरिंग व्यवसाय करतोय, सुरुवातीला मी एका केटस् मध्ये वेटर काम केले. 2004 ला मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. प्रचंड मेहनत आणि हलाखीची परिस्थिती होती परंतु स्वतः वर विश्वास होता. आणि घराची जबाबदारीही होती.
Santosh Sasane

2012 मध्ये आत्याचे व बहिणीचे लग्न करून दिले त्यामध्ये 2013 ला माझा हे लग्न झालं त्यापुढेही बिझनेस मी चालू ठेवला.
वेटर काम करत असताना केटरिंग व्यवसाय मध्ये गेलो. काम करत करत किचन पर्यंत पोहोचलो. किचनमध्ये गेल्यानंतर माझ्या डोक्यात पूर्ण कामाची माहिती घेऊन मी स्वतः ऑर्डर घ्यायला लागलो.
कॉलिटी
माझ्या कामाची कॉलिटी आणि जेवणाची चव बघून बरेच जण मला स्वतःहून ऑर्डर देऊ लागले.
मी सुरुवातीला सात-आठ वर्ष असेच बाहेरून काम केलं, सात आठ वर्षानंतर मी स्वतःच भांडवल म्हणजे स्वतःची भांडी घेतली आणि आता सध्या माझ्याकडे दीड ते दोन हजार लोकांचे भांडे आहे मी सहज ऑर्डर घेऊ शकतो आणि मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन करू शकतो.
यापुढे मला माझा व्यवसाय खूप मोठा करायचा आहे त्यामधूनच माझी ओळख निर्माण करायची आहे.
नुकतीच माझी MCED च्या निवासी प्रशिक्षणसाठी निवड झाली होती.
तिथे मला खूप काही नवीन शिकायला मिळालं. आणि मला माझा बिझिनेस वाढवण्यासाठी कशी प्लॅनिंग करावी लागेल याबाबत माहिती मिळाली.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईने व
माननीय डॉक्टर हर्षदीप कांबळे सरांचे प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला माननीय डॉक्टर हर्षदीप कांबळे सरांचेमनापासून आभार
माननीय विनोद तुपे सर प्रकल्प अधिकारी एमसीडी यांच्या प्रयत्नातून मला या योजनेची संधी मिळाली धन्यवाद तुपे सर
फक्त औरंगाबादच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझा व्यवसाय पोहोचवायचा आहे आणि
शंभर टक्के येणाऱ्या दोन वर्षांमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझ्या केटरिंग बिझिनेसची मार्केटिंग करणार.
कॅन्टीनमध्ये काम करून उभा केला केटरिंगचा व्यवसाय
तुम्हालाही तुमच्या बिझिनेसचा प्रवास जगाला सांगायचा आहे तर तुमचा प्रवास टाईप करुन आम्हाला व्हॉट्स ॲप करा – 8793932893