Business Kings

मिनाक्षी निकम यांचा खडतड प्रवास / Minakshi Nikam

पोटासाठी हाती घेतला सुई दोरा आणि बनली उद्योजिका, आज आपण पाहणार आहोत दिव्यांगाचा आधारवड मिनाक्षी निकम यांचा खडतड प्रवास. Minakshi Nikam

Minakshi Nikam

अस म्हणतात स्वतःच पोट भरन सोपं असत पण दुसऱ्याच पोट भरता आलं पाहिजे.

Minakshi Nikam

झोपडी वजा असलेले घर, त्या समोरचे झाड आणि त्याच्या वरचा पार, खेळणारी मुलं,

समोर बसलेली दोन ते तीन वर्षाची मुलगी, तिलाही खेळायचं असतं पण आजी सांगते.

तू अपंग आहेस तुला पोलिओ झालाय खेळता येणार नाही तिला कुठे कळत असतं काय झालंय.

खूप रडत बसते शेवटी संध्याकाळी बाबा येतात आणि तिला म्हणतात, उद्या तुला वेगळा खेळ आणून देतो हं.

दुसऱ्या दिवशी येऊन तिला एक चित्राचे पुस्तक आणि रंगाची पेटी भेट देतात. आणि सांगतात

अंगणातच बसायचं पण मुलांकडे पाठ फिरवून. मुलांना उत्सुकता लागते आणि मुलं तिच्या समोर येऊन बसतात.

स्वतःच्या आयुष्यात देखील तेच करते येणाऱ्या संकटावर आणि बिकट परिस्थितीवर मात करते, पाठ फिरवते आणि स्वतःच्या रंगरेषांनी स्वतःच कर्तुत्वच चित्र रेखाटायला तयार होते.

मिनाक्षीताई यांचा विलक्षण प्रवास

मिनाक्षी निकम यांनी अपंगत्वावर मात करून उद्योजिका बनल्या व दिव्यांग्याणा आत्मनिर्भर बनवलं…

अपंगांना स्वावलंबी व अभिमानी बनवणाऱ्या चाळीसगावच्या मिनाक्षी निकम यांना वयाच्या दोन वर्षे पासूनच पोलिओने अपंगत्व आलं.

त्यावेळी त्यांना सरकारी अनअवस्थेलाही सामोरे जावं लागलं त्याचवेळी त्यांनी ठरवलं उद्या ही वेळ कुण्याही अपंग व्यक्तीवर येऊ द्यायची नाही.

त्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायची गरज आहे, मिनाक्षीताईंनी मोठ्या मेहनतिने प्रत्येक स्वप्न साकारली.

ताईंना अपंगात्वावर मात करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सर्वात आधी आधार दिला तो सुई आणि दोऱ्याने

त्यांना आपल्या प्रयत्नांनी नेमकी सुरुवात कशापासून करायची तेच उंगतच नव्हतं.

जुन्या कपड्यांना टिपा मारून द्यायचं काम त्यांनी सुरू केलं.

मग शिवणकामाच्या आवडीतून आपलं फॅशन डिझायनिंग शिक्षण पूर्ण केलं.

आज ‘राज फॅशन डिझाईन‘ हे आपलं कस्टम डिझायनिंग स्वबळावर भरभटीला आणला.

दिव्यांगाचा आधारवड मिनाक्षीताई

मिनाक्षीताईंनी अपंग, विधवा आणि गरजू स्त्रियांना मोफत शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं.

अपंगाच्या वाटेला सरकारी मनस्ताप येऊ नये म्हणून त्यांनी अपंग पुनर्वसनाचे कामही हाती घेतलं.

आपल्यावर झालेल्या अन्यायाने निराश न होता त्यालाच आपलं शस्त्र बनवून स्वतः अपंगांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या मिनाक्षीताई आज हजारांचे प्रेरणास्थान आहेत.

ताईंना नेहमीच शाळेत जाण्याची इच्छा होती, पण जमत नव्हते. एक परदेशी गुरूजी होते, गुरुजी त्यांना रोज घरी येऊन शिकवायचे.

गुरुजी नेहमी त्यांना म्हणायचे “बुद्धीचे पाय कर त्याच्यावर पळत जा, धावत जा आणि उंच गगन भरारी घे.”

त्यांना वाटते की आतापर्यंत जिथे पोहोचली ते शक्य झाले फक्त परदेशी गुरुजींमुळे.

सुई आणि दोरा

वयाच्या बाराव्या वर्षी वडील गेले घरातील सर्व जबाबदारी अंगावर पडली, छंदाचे व्यवसायात रूपांतर करावे लागले.

मशीनच चाक दिसलं आणि सुई मध्ये दोरा टाकला व संसार शिवायला सुरुवात केली. छान प्रकारे स्वयंदीपचा संसार जोडला गेला.

लहान असताना आजीने ताईंना शेतात घेऊन गेली. अचानक साप पायावर सरपटत आला तेव्हा ताई थंड पडल्या.

पण जेव्हा सापाचे निरीक्षण करायला लागल्या तेव्हा तिच्या लक्षात आलं की..

सापाला पाय नाही तरी एवढ्या उन्हाचा तो एवढी दहशत करू शकतो तर आपण का नाही ?

स्वयंदीप

स्वाती मेहता यांनी स्वखुशीने ताईंना शिवणकाम शिकवलं.

एकदा असंच एक दिव्यांग मुलगी मिनाक्षीताई कडे आली, तिने विचारलं की मला शिवणकाम शिकायचंय, तेव्हापासून स्वयंदीपची सुरुवात झाली. स्वयंदीप नावाची संस्था उभारली..

दिव्यांगामध्ये स्वयंदीप प्रज्वलित करणारी मीनाक्षी…

दिव्यांगाकडून ताई कोणत्याही प्रकारचे दान घेत नाही, त्या व्यतिरिक्त त्यांना मोफत शिक्षण व राहणे, खाण्याची सोय ही पुरवतात.

मिनाक्षीताईंनी अपंगामधला न्यूनगंड काढला आहे, त्यांना स्वाभिमानी व आत्मनिर्भर बनवल आहे.

 स्वयंदीपमध्ये दिव्यांग राहतात, स्वतःचे अस्तित्व निर्माण करतात, स्वच्छंदी जगतात आणि खूप अपेक्षांना पंख लावून गगन भरावी घेतात.

वेस्ट पासून बेस्ट तयार करणे..

हा उपक्रम देखील दिव्यांग मुली राबवतात.

रडायचं नाही आता लढायचं आणि लढताना सुद्धा हसायचं..

आयुष्य खूप सुंदर आहे अधिक सुंदर बनवायचं हाच संदेश मिनाक्षीताई नेहमी देतात..

उद्योजिका मिनाक्षी निकम यांचा प्रेरणादायी प्रवास त्यांच्या शब्दात

नक्की 👆 वाचा

Leave a Comment