Business Kings

कॅन्टीनमध्ये काम करून उभा केला केटरिंगचा व्यवसाय / Kachru Gawli

माझं नाव कचरू यादवराव गवळी राहणार उस्मानपुरा, औरंगाबाद. Kachru Gawli

मी गेल्या बारा-तेरा वर्षांपासून केटरिंग व्यवसाय करतोय, सुरुवातीला मी एका कॅन्टीनमध्ये कामाला होतो औरंगाबाद मध्ये govt. इंजिनिअरिंग कॉलेज तेथे मी चार ते पाच वर्षे काम केलं

Business Kings

त्यानंतर केटरिंग व्यवसाय मध्ये गेलो हळूहळू काम करत करत किचन पर्यंत पोहोचलो. किचनमध्ये गेल्यानंतर दोन ते तीन वर्षांमध्ये मी पूर्ण माझ्या डोक्यात पूर्ण कामाची माहिती घेऊन माझा स्वतः हळूहळू छोटी छोटी ऑर्डर घ्यायला लागलो.

कॉलिटी

त्यानंतर माझे कॉलिटी बघून बरेच जण मला ऑर्डर दिली मी असं सात आठ वर्ष असे केलं सात आठ वर्षानंतर मी स्वतःच भांडवल म्हणजे स्वतःची भांडी घेतली आणि आता सध्या माझ्याकडे दीड ते दोन हजार लोकांचे भांडे आहे मी सहज ऑर्डर घेऊ शकतो आणि करू शकतो

Businesskings.in

यापुढे मला माझा व्यवसाय खूप मोठा करायचा आहे त्यामधूनच माझी ओळख निर्माण करायची आहे.

औरंगाबाद नसेल तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझा व्यवसाय पोहोचवायचा आहे आणि शंभर टक्के येणाऱ्या दोन वर्षांमध्ये पूर्ण व्यवसाय जिल्ह्यामध्ये मार्केटिंग करणार.

वार्षिक उत्पन्न

सध्या माझा वार्षिक उत्पन्न फक्त चार महिने करिता तीन ते साडेतीन लाख रुपये आहे.

एमसीडी रेल्वे स्टेशन औरंगाबाद येथे ट्रेनिंग घेत असताना मी सुचवलं की ऑफ सीजन असताना साईड बिजनेस करता येतो.

मला एमसीईडी मध्ये आल्यानंतर खूप व्यवसायाची माहिती मिळाली व मी आता साईड बिजनेस 100% करू शकतो आणि

एमसीडीमार्फत सीएमईजीपी योजनेचा लाभ मिळतोय 100% आणि मी तो घेणार Kachru Gawli

Businesskings.in

दोन वर्षांमध्ये माझा व्यवसाय वाढवणार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईने व माननीय डॉक्टर हर्षदीप कांबळे सरांचे प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला.

चार वर्षांपूर्वी समाज कल्याण येथून महात्मा फुले मंडळा तर्फे तीन लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते. आणि मी ते व्यवस्थित रिपेअर करत आहे आणि त्याच ट्रांजेक्शनच्या आधारावर मला पुढील कर्ज मिळण्यास मदत होणार आहे.

माननीय डॉक्टर हर्षदीप कांबळे सरांचेमनापासून आभार

माननीय विनोद तुपे सर प्रकल्प अधिकारी एमसीडी यांच्या प्रयत्नातून मला या योजनेची संधी मिळाली धन्यवाद तुपे सर

धन्यवाद जय भिम जय भारत

तुम्हालाही तुमच्या बिझिनेसचा प्रवास जगाला सांगायचा आहे तर तुमचा प्रवास टाईप करुन आम्हाला व्हॉट्स ॲप करा – 8793932893

वेटर काम करून उभा केला केटरिंगचा व्यवसाय

Leave a Comment